Weight Loss tips in Marathi | वजन कमी करण्यासाठी करा हे नऊ सोपे उपाय |

Weight Loss Tips in Marathi|

वजन कमी करण्यासाठी करा हे नऊ सोपे उपाय

 

वजन ही फारच मोठी समस्या झाली आहे ज्याला पाहावं त्याचे वजन वाढते आहे. त्याला वजन कमी करायचं आहे. बऱ्याच प्रकारचे उपाय चालू असतात पण सातत्याने वजन कमी मात्र राहत नाही.

आता वेटलॉस हा इतका महत्त्वाचा शब्द झालाय की , त्याच्याभोवती एक मोठी इंडस्ट्री उभी राहिली आहे की त्याचं मोठं अर्थकारणही चालतं. का बर वेटलॉस इतका अवघड झाला असावा? काहीजण तर प्रयत्न करून करून कंटाळून जातात आणि नंतर प्रयत्न सोडून देतात . वेट लॉस हा कुठलाही डेस्टिनेशन नसून तो एक प्रवास आहे.

जगात असलं कुठलंही औषध नाही की जे तुम्हाला आयुष्यभर वजन नियंत्रित करायची गॅरंटी देते. त्यासाठी काही नियम तर तुम्हालाच पाळायला लागतील. तर आपण, या Weight Loss Tips in Marathi या लेखात पाहूयात की ,अशा कोणत्या टिप्स आहेत की त्या सातत्याने फॉलो केल्या तर वजन नियंत्रित राहील ,वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.

वजन वाढण्याची असंख्य कारणे आहेत. ती वारंवार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असता, वाचत असता ,त्याची अनेकदा चर्चा होते आणि प्रत्येकाला आपलं स्वतःचं वजन का वाढले याचं कारण बऱ्याचदा माहिती नसतं. आज आपण पाहणार आहोत उपाय, तुमचं वजन वाढण्याच कारण कुठलंही असलं तरी उपाय उपयुक्त होतील असेच साधे सोपे सहज करता येणारे आहेत.

Weight loss tips in Hindi

 

उपाय 1 -जेवणाची वेळ:

रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर तुम्ही जेवढे उशिरा जेवता तेवढ तुमच पचन मंदावत. अग्निमांद्य होतं, आमदोष वाढतो आणि चरबी वाढायला लागते. लेट नाईट डिनर हे एक फ्याडच आहे . कधीतरी महिन्यातून एकदा असं जेवायला काहीच हरकत नाही . पण तुमची रोजची जेवणाची वेळ सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळ असायला हवी . संशोधनाने आता हे सिद्ध केल आहे की, इन्सुलिन लेवल रात्री सात नंतर कमी कमी होत जाते. पचनशक्ती मंदावते . त्यामुळे तुम्ही जे काही खाता त्याचं कन्वर्जन शुगर मध्ये किंवा फॅटमध्ये होत जातं.

तुम्हाला दीर्घायुष्य व्हायचं असेल ,चाळीसी नंतर बीपी ,शुगर ,कोलेस्टेरॉल हे विकार दूर ठेवायचे असतील, पोटाचा घेर कमी करायचा असेल ,तर सूर्यास्ताच्या जवळपास जेवण करायला हवं . तर मग त्यासाठी तुमची दुपार किंवा सकाळची जेवणाची वेळ देखील बदलायला हवी. तुम्ही दुपारी दोन-तीन वाजता लंच करत असाल, तर रात्री सहा सात वाजता भूक लागेल का ? त्यासाठी सकाळच्या जेवणाची वेळ दहा किंवा अकरा वाजताची असायला हवी.

आता मग काही जणांना असा प्रश्न पडला असेल की ,संध्याकाळी लवकर जेवलं तर रात्री भूक लागेल. पण असं अजिबात नाही, तुम्ही पोटभर जेवण घेऊ शकता पण ते शक्य तितक्या लवकर. तुम्हाला एकदा अशी सवय लागली तर मग रात्री भूक लागत नाही. हा एक सायकॉलॉजिकल गैरसमज आहे की रात्रीच जेवण लवकर केलं तर मला झोप येणार नाही, पुन्हा भूक लागेल,पण असं अजिबात होत नाही

उपाय 2: विकतचे खाद्यपदार्थ बंद करावे

यासाठी आपण एक होमवर्क करायचा, सकाळी पासून रात्रीपर्यंत आपण काय काय बाहेरच खाल्लं या पदार्थांची यादी करायची. जसं की ,बिस्कीट, टोस्ट, सॉस, ब्रेड ,लोणचं, बाहेरचा नाष्टा, जेवण वगैरे वगैरे. जे पण तुम्ही बाहेरचा पॅकबंद फूड खाताय ते पूर्णपणे कमी करायचं किंवा बंद करायचं या उपायाने वजनामध्ये लक्षणीय फरक पडतो. तुम्हाला समजा आठवड्यातून सात ही दिवस हा नियम पाळता येत नसेल तरी पाच दिवस ,सहा दिवस तरी नक्कीच प्रयत्न करायला हवेत. आणि एखाद्या दिवशी तुम्ही बाहेरच खाऊ शकता.

उपाय 3 – आहारातील तेल कमी करणे :

साधारण दर मानशी दर महिना अर्धा किलो ग्रॅम तेल असं डॉक्टरांनी ठरवलेलं प्रमाण आहे. आपल्या घरात किती माणसे आहेत आणि महिन्याला आपण किती तेल वापरतो याचा हिशोब फक्त गृहिणींनीच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने करायला हवा.

पोळी ऐवजी फुलका,भाकरीचा समावेश आहारात करणे. कोशिंबिरी, ढोकळा, चटण्या यांना तेलाची फोडणी न देणे. भाजीला तेल मोजून टाकणे आणि तळण्याऐवजी भाजणे, उकडणे, परतणे अशा प्रक्रिया करणे. या छोट्याशा टिप्स आणि आपल्या जिभेवर कंट्रोल एवढे जमलं की वजन कमी होण्यास नक्कीच खूप मदत होते . आणि रिफायनर तेला ऐवजी लाकडी घाण्याचे तेल वापरायला हवं

उपाय 4 -आहारातील साखर व मीठ यांचे प्रमाण कमी करणे:

हे दोन्ही पदार्थ केमिकल युक्त आणि शरीरातील पाणी शोषून घेणारे आहेत . साखर आणि मिठाचा अतिरेक झाला की , त्याचा दुष्परिणाम शरीर घटकांवर होतोच. बऱ्याच जणांना वाटतं की आपण गोड खातच नाही. पण दिवसातून जर तीन ते चार वेळा चहा पीत असाल आणि साखरेचा चहा पीत असाल तर दिवसातून अर्धी ते पाऊण वाटी साखर शरीरात जाते . ती साखर शरीर कसं काय पचवणार? कुठलीही औषध घेतली तरी एवढी साखर शरीर किंवा ते औषध पचवू शकत नाही. जर तुम्हाला एकदम साखर कमी करायला अवघड जात असेल तर हळूहळू कमी करा. जिथे तुम्ही दोन चमचे साखर वापरता तिथे एक चमचा वापरा .
मिठाचा पण असंच आहे. योग्य प्रमाणात मीठ हे शरीरासाठी आवश्यक आहे पण आपल्या नकळत बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणात मीठ जातं . जसं की सॉस, बेकरीचे पदार्थ, वेफर्स, लोणचं, पापड ,चायनीज, मेयोनीज, पनीर आणि चीज या सगळ्या आणि रेडिमेड किंवा विकतच्या पदार्थांमध्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त मीठ असतं

उपाय 5-आहारातील गहू आणि भाताचे प्रमाण:

जर तुम्ही दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळी नाश्त्याला चपाती, दुपारच्या जेवणात किंवा डब्यात चपाती आणि रात्रीच्या जेवणात पण चपातीच खात असाल तर असं न करता एका वेळेस तरी चपाती ऐवजी भाकरीचा समावेश करा. जर तुमचं वजन जास्त असेल तर आठवड्यातून पाच दिवस सहा दिवस मल्टीग्रेन भाकरी खाऊ शकता.
यामध्ये राजगिरा, नाचणी ,बाजरी आणि ज्वारी आहे ही तृणधान्ये खूप फायदे देतात. वजन, शुगर, कोलेस्टेरॉल कमी करतात.
त्यामुळे ही मल्टीग्रेन भाकरी तुम्ही रोज खाऊ शकता. बदल म्हणून एखादे दिवशी गहू खायला हरकत नाही.

भाताला पण चांगला पर्याय म्हणजे वरईचा भात. यामुळे शरिरात कॅलरी कमी जातात ,शरीरातील मेध कमी व्हायला मदत होते. पचायला ही तृणधान्य हलकी असतात त्यामुळे या मिलेटस चा समावेश आहारात वाढवायला हवा

उपाय 6- रोज व्यायाम करणे:

रोज 20 ते 30 मिनिट व्यायाम करणे . तुम्हाला वाटेल की रोजची धावपळ आहे, घरातलं काम आहे. पण तो व्यायाम नाही. जो सलग केला जातो आपल्या शरीराकडे ,श्वासाकडे लक्ष देऊन ,एका लईत केला जातो, त्याला व्यायाम म्हणतात.
त्यामुळे तुमच्या आवडीनुसार, प्रकृतीनुसार, जीवनशैलीला योग्य असा कुठलाही व्यायाम प्रकार निवडा आणि तो रोज नियमित करा. जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर त्यामध्ये वैविध्य आणा डेन्सिटी वाढवा.

उपाय 7- झोपेची वेळ:

जरी तुम्ही पुरेशी झोप म्हणजे सहा सात तास घेतली तरी हे महत्त्वाचं आहे की, तुम्ही किती वाजता झोपता? रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठण्याची सवय असेल, तर तुमच्या शरीरातील मेदाचं संतुलन बिघडणार.
जागरणाने आपल्या शरीरात असे केमिकल तयार होतात की जे सतत स्ट्रेस खाली असल्याप्रमाणे शरीरात मेद साठवून ठेवायला सुरुवात करतात, फॅट साठवून ठेवायला मदत करतात . त्यामुळे लवकर झोपा आणि लवकर उठा. रात्री दहा ते साडेदहा हा कफाचा काळ आहे. यावेळी चांगली झोप येते . शरीरातील दोष संतुलित राहतात म्हणून रात्री दहा-साडेदहा पर्यंत झोपणे आणि सकाळी पाच साडेपाचच्या सुमारास उठणे, ही योग्य वेळ आहे. जागरणानी वात वाढतो, कफ दोष कमी होतो ,वजन ही वाढतं शरीराचे इतरही नुकसान होतं.

उपाय 8 -पाणी :

बरेच जण सकाळी उपाशीपोटी किंवा दिवसभर भरपूर पाणी पितात . भरपूर पाणी पिणे चांगलं आहे ,असा बऱ्याच जणांचा समज असतो. त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते,पण आपलं शरीर म्हणजे काय पाईपलान नाही की एकदा दिलेलं पाणी जसच्या तस पासआऊट होईल. शरीराला त्यावर काही प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी पचनशक्ती वापरावी लागते . अनावश्यक पाणी टाळा. तुम्हाला जरी वजन कमी करायचं असलं तरीही तुमची प्रकृती ,ऋतुमान ,जीवनशैली यांना अनुकरण आणी जेव्हा तहान लागेल तेव्हा आणि तितकच पाणी प्या.

गरम पाणी प्यायचं का? तर चालेल सकाळी उपाशीपोटी तुम्ही अर्धा कप गरम पाणी पिऊ शकता. किंवा जिरे ओवा बडीशेप अशा गोष्टींचा काढा करून सकाळी उपाशी पोटी अर्धा कप पिला तर पचनशक्ती सुधारते. फॅट्स कमी व्हायला मदत होते.

वजन कमी करण्यासाठी सकाळी सकाळी बरेच जण लिंबू मध पाणी पितात पण फक्त लिंबू मध पाण्याने वजन कमी होत नाही तर आपण बाकीचे जे उपाय पाहिलेत ना ते देखील महत्त्वाचे आहेत.
एक तर गरम पाण्यात मध घालणं आयुर्वेदानुसार निषिद्ध आहे, विरुद्ध आहे आणि दुसर असं सकाळी उपाशीपोटी लिंबासारखा तीव्र आंबट असणारा पदार्थ वर्ज्य आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर आवळ्याचा ताजा रस किंवा आवळा चूर्ण एक चमचा सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत घेऊ शकता.

मधाने वजन कमी होतं हे मान्य आहे पण सध्या नैसर्गिक मध मिळणं च खूप अवघड आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरं तुम्ही दिवसभर पाण्याबरोबर थोडा थोडा मग टाकून पित रहा तर त्याने वजनावर काही परिणाम होईल . पण फक्त सकाळी एक कप पाण्यात एक चमचा मध आणि तो देखील कृत्रिम मध घेतला तर काहीच उपयोग होत नाही.

उपाय 9- व्यसन:

यामध्ये सगळ्या प्रकारची व्यसनं आली म्हणजेच अगदी हातातल्या मोबाईलचं सुद्धा . अगदी लहान बाळापासून ते वृद्ध लोकांपर्यंत या मोबाईलची सवय नाही व्यसन च लागलय.
दिवसातले किती तरी तास आपण मोबाईल बघण्यात घालवतो ,त्यामुळे शारिरीक हालचाली कमी होतात आणि हे अगदी नकळत होते. कोरोना नंतरच्या काळात तर सगळ्यांच्या मोबाईल वापरण्या चा वेळ वाढला आणि शारीरिक हालचालीचा दर कमी कमी होत चालला आहे, हे प्रमाण खूप घातक आहे.

दुसर व्यसन आहे खुर्चीच ,दिवसातले आठ आठ दहा दहा तास एकाच ठिकाणी बसून राहणं हे सगळ्यात मोठे व्यसन आहे. सगळ्यांनाच बैठ्या जीवनशैलीची इतकी सवय होऊन जाते की जाणवत सुद्धा नाही की आपण चार ते पाच तास एकाच ठिकाणी बसून राहिलोय. आता त्या गोष्टींमुळे फॅट्स वाढणार ,वजन वाढणार हे स्वाभाविक आहे.

तिसरा व्यसन आहे चहा आणि कॉफीच . सतत बसून राहिल्यामुळे मेंदूला सुस्ती येते आळस येतो आणि म्हणून ती सुस्ती घालवण्यासाठी सारखं चहा कॉफी कडे लक्ष जातं. तात्पुरती तरतरी मिळण्यासाठी चहा कॉफी घेतली जाते , त्यामुळे अर्थात वजन वाढतं

चौथ व्यसन आहे धूम्रपान किंवा अल्कोहोल किंवा कुठलीही व्यसन. कोणी किती जरी जाहिरात केली तरी अल्कोहोल शरीराच्या दृष्टीने कुठल्याही बाबतीत चांगलं नाही. कितीही कमी प्रमाणात धूम्रपान ,मद्यपान करत असाल तरी त्यामुळे शरीराचा नुकसान होणार हे शंभर टक्के सत्य आहे.

हे ही वाचा:  मल्टीग्रेन भाकरी/ Multigrain Atta

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. गरम पाणी पिऊन एक आठवडा मी किती वजन कमी करू शकतो?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सुरुवात गरम पाणी पिऊन करू शकता पण फक्त गरम पाणी पिण्याचा तितका परिणाम होणार नाही गरम पाण्याबरोबरच भूक नियंत्रित कशी करता येईल हेही पाहिला हवं तसेच त्याबरोबरच नियमित व्यायाम हा देखील खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जेवढ्या कॅलरीज रोज लागतात त्यापेक्षा अधिक कांद्री सर तुम्ही बंद करू शकलात तर आपोआपच वजन कमी होऊ शकते.

2. वजन कसे कमी करावे घरगुती उपाय

१. सकाळी सकाळी उपाशीपोटी एक क्लास कोमट पाण्यामध्ये पाव तुकडा लिंबाचा रस घालावा आणि एक चमचा मध घालावा . याने वजन कमी होण्यास मदत होईल
२. एक चमचा जिरे रात्री एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून घेऊन कोमट उपाशीपोटी पिल्याने सुद्धा लवकर वजन कमी होण्यास मदत होते
३. जसं जिऱ्याचे पाणी घेतो तसेच ओवा रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळून गाळून घेऊन कोमट पाणी उपाशीपोटी पिल्याने सुद्धा लवकर वजन कमी होण्यास मदत होते

1 thought on “Weight Loss tips in Marathi | वजन कमी करण्यासाठी करा हे नऊ सोपे उपाय |”

Leave a Comment