स्किन केअर | “त्वचा : सौंदर्याचा आरसा”
सौंदर्याचा आरसा म्हणजे त्वचा . फक्त चेहऱ्याचीच नाही तर बर का पूर्ण शरीराची त्वचा कशी आहे यावर तुमच सौंदर्य किंवा तुमच्या आरोग्याचे जजमेंट पुढच्या व्यक्तीकडून केलं जातं . आणि सुंदर दिसावं तरुण दिसावं ही तर सर्वांचीच नैसर्गिक इच्छा असते . त्यामुळे त्वचेकडे आणि त्वचेच्या सौंदर्याकडे लक्ष देणं ही देखील एक स्वाभाविक गोष्ट आहे . विशेषतः सर्व स्त्रियांसाठी तसेच सध्या तर फक्त तरुण मुलीच नाहीत तर तरुण मुलं देखील आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी किंवा त्वचेच्या सौंदर्याविषयी खूप जागरूक आहेत . पण त्यासाठीचे जे उपाय करायला हवेत ,त्वचा सुंदर व्हायला जे प्रयत्न करायला हवेत , त्या प्रति मात्र विशेष जागरूकता नाही ,असं दिसून येतय
बरेचदा अनेकांना काय वाटतंय की बरेचसे कॉस्मेटिक, फेसवॉश आहेत ,फेस पॅक आहेत फक्त हे वापरल्यानेच त्वचा सुंदर होईल. पण खरंतर जेव्हा त्वचा आतून उजळते ,तेव्हा तिचा ग्लो काही वेगळाच असतो . तर त्वचा आतून आणि एकूण सुंदर कशी करावी हे आपण या Skin Care “त्वचा : सौंदर्याचा आरसा” या लेखात पाहूयात.
डिटॉक्स :त्वचा आतून सुंदर करण्याचा सगळ्यात पहिला उपाय आहे डिटॉक्स
डिटॉक्स म्हणजे काय तर शरीरावरच सूक्ष्म स्तरावर केलं जाणार शुद्धीकरण . आयुर्वेदानुसार त्वचेला एक उपमा दिली आहे ती म्हणजे “शिरात संतानिका इव” शिर म्हणजे काय तर दूध. दुधावरची जशी साय असते तसं रक्तावरचा बाहेरचा स्तर म्हणजे त्वचा आहे. जस दूध खराब झाल तर साय खराब होणार तस रक्त अशुद्ध झालं किंवा रक्तात काही दोष निर्माण झाला तर तो त्वचेवर दिसणार. रक्तातले दोष , रक्तातील वाढलेली उष्णता किंवा शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत ते कमी करण्यासाठी ही सूक्ष्म स्तरावर शरीरशुद्धी करायला हवी त्यालाच आपण म्हणतो डिटॉक्स.
जेव्हा तुम्ही घेता त्या आहाराचे रूपांतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होत नाही ,तेव्हा सगळ्या शरीर घटकांची निर्मिती बिघडते. समजा जो मलभाग आहे तो शरीरातून बाहेर काढून टाकायला हवा ,जर तो बराच वेळ शरीरात तसाच राहिला तर अर्थात रक्तामध्ये किंवा शरीर घटकांमध्ये त्याचं ऍबसॉरपशन होत राहतं . मग हे टॉक्सिन्स किंवा आमदोष आहे तो शरीराच्या रक्ता बरोबर त्वचेपर्यंत पोहोचतो .
त्वचा देखील शरीरातील मल बाहेर फेकून देण्याचे काम करत असते ,ते कसं तर घामावाटे . हा जो टॉक्सिन्सचा पार्ट आहे जो रक्तांमार्फत त्वचेपर्यंत आलाय तो बाहेर काढून टाकायला त्वचा पण प्रयत्न करायला लागते आणि मग त्वचेवर येतात पिंपल्स , फोड किंवा पुरळ किंवा काळे डाग , चट्टे किंवा त्वचा विकार म्हणजेच त्वचा रोग. त्वचेच्या समस्यांचे मूळ कारण काय आहे तर शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स . आणि त्वचा सुंदर करायचे असेल तर त्यासाठी डिटॉक्स करण हे सगळ्यात पहिला महत्त्वाचा उपाय आहे.
पंचकर्म करून तुम्ही डिटॉक्स करू शकता . शरीरशुद्धेसाठी सर्वात उत्तम आहे पंचकर्म . थोड्या प्रमाणात जर शरीरशुद्धी करायची असेल तर रोज रात्री एक चमचा त्रिफळा चूर्ण घेऊ शकता किंवा ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे आणि प्रकृती वाताची आहे त्यांना आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतलं तरी सूक्ष्म स्तरावर डिटॉक्स होतं
स्नेहन : त्वचा सुंदर करण्याचा दुसरा उपाय आहे स्नेहन
त्याला आपण मॉइश्चरायजिंग म्हणू शकतो वात प्रकृतीची जी त्वचा असते ती लवकर कोरडी पडते ,त्याला डाग पडतात किंवा ती लवकर काळपट पडते आणि पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांची त्वचा पातळ असते ,नाजूक असते त्यावर लालसरपणा किंवा चट्टे येण्याच प्रमाण जास्त असतं .
शिवाय पित्त प्रकृतीमध्ये तीळ किंवा वांग येण्याचे प्रमाण जास्त असते त्यांना पिंपल्स आले तर ते दुखतात लाल होतात त्यामध्ये पज होतो आणि त्यांची त्वचा तेलकट असते या त्वचेवर लवकर सुरकत्या पडतात तर वात आणि पित्त या दोन्ही प्रकृतींसाठी स्नेहन म्हणजे एक प्रकारचं मॉइश्चरायजिंग खूप आवश्यक आहे
वात प्रकृतीची त्वचा असेल तर बदामाचे तेल किंवा तिळाचे तेल हे तुम्ही पूर्ण त्वचेला ,अंगाला लावू शकता, जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर आठवडातून एकदा पूर्ण अंगाला या तेलाने मसाज करू शकता आणि तुमची त्वचा पित्त प्रकृतीची असेल तर अशी त्वचा आधीच थोडी तेलकट असते पण ती पातळ आणि सेन्सिटिव्ह असते यासाठी तुम्ही शुद्ध तुपाचा मसाज करू शकता.
जी आयुर्वेदिक शास्त्रोक्त विधीन सिद्ध केलेली तेल असतात जसं कुंकुमादी तेल , बॉडी मसाज ऑइल यामध्ये अनेक औषधे वापरलेले असतात त्यामुळे ही तेलं सूक्ष्मगामी असतात म्हणजे काय तर शरीरामध्ये, त्वचेमध्ये लवकर ऍबसॉरपशन होतात.
हायड्रेशन : त्वचा सुंदर करण्याचा तिसरा उपाय आहे त्वचा हायड्रेट ठेवणे
यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं , द्रवपदार्थ घेणं महत्त्वाचं आहे . बऱ्याच लोकांना तर पाणी पिण्याची आठवण ही राहत नाही . पण जेव्हा शरीरातला रस धातू म्हणजे द्रव भागाचा संतुलन बिघडतं तेव्हा त्वचा शुष्क होते, त्वचारोग होतात. शरीरातील हा रसा धातूच संतुलित ठेवण्यासाठी योग्य त्या प्रमाणात पाणी, फळ ,ताक , फळभाज्यांचा सूप असे द्रव पदार्थ ऋतूनुसार आपल्या आहारात योग्य प्रमाणात असायलाच हवेत. आतून जर हायड्रेशन कमी झालं म्हणजे द्रव भाग कमी झाला तर त्वचा कोरडी तर होते तसेच कॉलेजन कमी होते इलेक्टिसिटी कमी होते आणि एजिनची जी प्रक्रिया आहे ती वेगाने व्हायला लागते
उद्धवर्तन :त्वचा सुंदर करण्याचा चौथा उपाय आहे उद्धवर्तन
वेगवेगळ्या औषधी चूर्णांचा वापर करून उद्धवर्तन मन्हजे त्वचा स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते. याचेच एक प्रतिक म्हणजे आपण दिवाळीत वापरतो ते उठणे उबटन किंवा स्क्रब हल्ली बाजारात सहज मिळून जातात . हे आपल्या भारतीय त्वचेसाठी विशेषतः उपयुक्त आहेत कारण आपल्याकडे प्रदूषण खूप आहे . बहुतांश भाग उष्ण असतो सर्वांनाच घाम येतो शिवाय तेलकट त्वचेच प्रमाण जास्त आहे . त्यामुळे स्क्रब करणे किंवा उद्धवर्तन करणं हा स्किन केअर रुटीन चा एक आवश्यक भाग आहे . जेव्हा आपण साबण वापरतो तसेच सॉफ्ट असे फेसवॉश वापरतो तेव्हा व्यवस्थित घर्षण किंवा क्लिनसिंग होत नाही जे उठण्यामधल्या चूर्णामुळे होतं.
या उद्धवर्तनामध्ये वाळा ,चंदन, मुलतानी माती ,अनंतमूळ,मंजिष्ठा ,हळद अशा असंख्य औषधांचं योग्य कॉम्बिनेशन करता येतं. त्वचा फार कोरडी असेल तर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून वापरू शकता आणि तुमची त्वचा फार तेलकट असेल तर त्यात पाणी किंवा थोडासा लिंबाचा रस किंवा दही असे काही पदार्थ ऍड करून तुम्ही हे उद्धवर्तन करू शकता. तर हे उद्धवर्तन किंवा उठणे तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता.
उत्तम झोप: त्वचा सुंदर करण्याचा पाचवा उपाय आहे उत्तम झोप
जर झोप चांगली झाली नाही तर त्वचा काळवंडते आणि आणि हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला असेलच . कुठल्याही आवश्यक किंवा अनावश्यक कारणाने तुम्ही जागरण करत असाल तर त्वचा सुकुमार, सुंदर होऊ शकत नाही. जागरणामुळे शरीरात एकूणच एजिंगची म्हणजे झीज होण्याची प्रक्रिया वेगात सुरू होते . म्हणून लवकर झोपा लवकर उठा हा मंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे तुमची मनस्थिती. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असेल, आतून आनंदी असेल तर त्वचेवर येणारा ग्लो काही वेगळाच . तुम्ही दुःखी असाल ,चिंतेत असाल , सतत काहीतरी टेन्शन, ताणतणाव किंवा चिडचिड होत असेल तर त्वचा कशी काय सुंदर दिसेल . म्हणून मन प्रसन्न करण्यासाठी संगीत ऐका ,योग्य तो व्यायाम करा ,आपले छंद जोपासा ,विश्रांती घ्या आणि तणावापासून मुक्त राहण्यासाठी योगनिद्रा , ध्यान साधना असेही उपाय करा
तर हे झालं स्किन केअर रुटीन.
आहारात बदल
आता आहारात काय बदल केल्यामुळे त्वचा अजून सुंदर दिसेल किंवा आतून अजून सुंदर होईल तर अधिकाधिक अँटिऑक्सिडंट किंवा अमिनो ऍसिडचा समावेश आहारात केला तर अजून फायदा होतो हे संशोधनाने सिद्ध केलंय . असे अनेक अँटिऑक्सिडंट असलेले घटक आहेत ते आपल्या भारतीय स्वयंपाक घरात असतातच . त्यांचा योग्य प्रमाणात वापर केला तर आणखीनच फायदा होतो . जस घरी बनवलेले तूप आहे , सुकामेवा आहे विशेषता बदाम काळ्या मनुका, सुके अंजीर , अक्रोड या सगळ्यांमध्ये अनेक खनिजे आहेत , विटामिन्स आहेत, भरपूर अँटिऑक्सिडेंट आहेत त्यामुळे स्किनची जी एजिंग प्रोसेस आहे , वय वाढण्याची प्रक्रिया आहे ती कमी व्हायला मदत होते . कोलॅजन बिल्ड होत , इलॅस्टिसिटी चांगली होते आणि स्किन चा जो फर्मनेस आहे ,टाईटनेस आहे तो टिकून राहतो.
एकंदरच काय तर चौरस आहार आणि योग्य प्रमाणात पाणी, द्रव पदार्थ, भरपूर फळभाज्या योग्य प्रमाणात सुकामेवा आणि आपले भारतीय मसाले यांचा समावेश जागरूकपणे नियमित केला तर त्वचा उत्तम राहते.
अतिरिक्त काय काय गोष्टी कमी करायला हव्या तर सोडा, मीठ, साखर हे पदार्थ आहारातून शक्य तितके कमी करा . जंक फूड किंवा विकतच फूड बाहेरचा पॅकेड फूड शक्यतो टाळा किंवा शक्य असल्यास बंद करा.
हे ही वाचा: WEIGHT LOSS TIPS IN MARATHI| वजन कमी करण्यासाठी करा हे नऊ सोपे उपाय